प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाची सुधारित नियमावली जाहीर, बांधकाम व्यावसायिकांना कडक सूचना

प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाची सुधारित नियमावली जाहीर, बांधकाम व्यावसायिकांना कडक सूचना

भाईंदर:-मिरा-भाईंदर शहरात वाढत्या उष्णतेसह धूळ प्रदूषणाचाही त्रास नागरिकांना जाणवू लागला आहे. त्यामुळे महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांना यावर तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.

शहरातील विविध भागांत सध्या नव्या इमारतींचे आणि सिमेंट रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे. या कामांमधून मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण होत असून त्याचा त्रास स्थानिकांना होत आहे. यापूर्वी उच्च न्यायालयानेही महापालिकेला धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने काही प्रमाणात धूळ प्रदूषणावर नियंत्रण मिळवले होते. मात्र, अनेक बांधकाम व्यावसायिक प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे  पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात नुकतीच एक विशेष बैठक घेण्यात आली. यामध्ये बांधकाम व्यावसायिकांना सुधारित नियमावलीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असून, पुढील काळात नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मिरा भाईंदर शहरातील धुळीची समस्या नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने बांधकाम स्थळी पाणी फवारणी,पत्रे उभारणी, बंदिस्त साहित्य वाहतूक आणि आरएमसी प्रकल्पांची नियमित तपासणी करण्याची नियमावली यापूर्वीच जाहीर केली होती. आता यात अधिक भर टाकत कामगार सुरक्षेसाठी साहित्य उपलब्ध करून देणे आणि प्रदूषणमुक्त  वाहन वापरणे अशा नव्या गोष्टीचा नियमावलीत समावेश करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow