बेकायदेशीर मलबा भरावप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद शिरवली ग्रामपंचायत प्रशासनाकडून बेकायदेशीर भरावाची दखल

बेकायदेशीर मलबा भरावप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद  शिरवली ग्रामपंचायत प्रशासनाकडून बेकायदेशीर भरावाची दखल
बेकायदेशीर मलबा भरावप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद  शिरवली ग्रामपंचायत प्रशासनाकडून बेकायदेशीर भरावाची दखल

वसई :विरार पूर्वेतील शिरवली गावचे हद्दीत मुंबईतील मलबा (डेंब्रिज) ट्रकच्या माध्यमातून वाहून आणून तो बेकायदेशीररित्या खाली केल्याप्रकरणी ट्रकचालकावर मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी 218/2024 नुसार भादंविक 125, 326(ब), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत.


प्राप्त माहितीनुसार, मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरार पूर्वेत शिरवली गाव आहे. या गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि.27) रात्रीच्या सुमारास बेकायदेशीर मलबा (डेंब्रिज) आणून खाली केल्याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी शिरवली बस स्टॉप परिसरात एक ट्रक (एमएच 03 इजी 1587) बेकयदेशीर मलबा खाली करत असताना मुख्य रस्त्यावरच आडवा झाला असल्याची माहिती ग्रामस्थांना लागली. त्यानिशी ग्रामस्थांनी सदर ठिकाणी पोहोचून संबंधित ट्रक ताब्यात घेऊन तो मांडवी पोलिसांच्या स्वाधीन केला. मांडवी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मलबा खाली करून पसार होणाऱ्या दोन ट्रकचालकांविरोधात याआधी पेल्हार पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केली आहे. तर आता मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा स्वरूपाचा एक गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सदरप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची अधिकृत माहिती शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल एडग यांनी दिली. तसेच अशा बेकायदेशीर मलबा वाहून आणणाऱ्या ट्रकचालकांवर वेळोवेळी कारवाई करण्याची मागणी शिरवलीकर ग्रामस्थांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow