भाईंदरमध्ये रामाच्या रूपातील गणपतीची स्थापना, मंडळ बनले अयोध्या

भाईंदर: भाईंदर पूर्वच्या महाराजे प्रतिष्ठान मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवात खास आकर्षण म्हणून रामाच्या रूपातील गणपतीची स्थापना केली आहे. ज्यांना अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी मंडळाने अयोध्या मंदिराच्या प्रतिकृतीची निर्मिती केली आहे, ज्यामुळे भक्तांना याच ठिकाणी रामाचे दर्शन होईल. मंडळाचे हे तिसरे वर्ष असून, मंडळाचे प्रमुख योगेश वैष्णव यांनी सांगितले की, अयोध्येतील राममंदिराचे दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तांना प्रत्यक्ष जाणे शक्य नसते, म्हणूनच मंडळाने यावेळी आपल्या गणपती मंडळाला अयोध्या मंदिराचे स्वरूप दिले आहे. मूर्ती देखील अयोध्येतील रामाच्या मूर्तीसारखी हुबेहूब आहे. गणेशोत्सवासाठी आकर्षक सजावट, भक्तांसाठी विशेष कार्यक्रम, आणि धार्मिक उत्साहाने मंडळ सजले आहे. मंडळाने या संकल्पनेतून भक्तांना रामाचे दर्शन व आशीर्वाद घेण्याची संधी दिली आहे, त्यामुळे यावर्षी मंडळाच्या आकर्षणाकडे लोकांचे विशेष लक्ष लागले आहे.
मंडळाचे उद्दिष्ट:अधिकाधिक लोकांना या गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्मिक आणि धार्मिक आनंद मिळावा, असा मंडळाचा उद्देश आहे.
What's Your Reaction?






