मीरा भाईंदर: जिल्हास्तरीय खेळाच्या आयोजनात निष्काळजीपणा, मुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मीरा भाईंदरमधील जिल्हास्तरीय खेळाच्या आयोजनात मुलांच्या सुरक्षेची मोठी ढिलाई समोर आली आहे. मैदानात खेळाच्या वेळी अनेक ठिकाणी खिळे सापडले, ज्यामुळे मुलांना इजा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याशिवाय, खेळाडूंना पिण्याचे पाणी, बसण्याची जागा आणि स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नव्हत्या. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या आयोजनाच्या वेळी महानगरपालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता, आणि कोणत्याही वैद्यकीय सुविधांचा अभाव होता. आम्ही जेव्हा दीपाली पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. त्यांच्या माहितीनुसार, मैदानात रुग्णवाहिका उपस्थित नव्हती, आणि पहिल्या राऊंडनंतरच खिळे काढण्यात आले, तेव्हापर्यंत मुलांना त्रास सहन करावा लागला.
आता प्रश्न आहे की या लापरवाहीला जबाबदार कोण आणि महानगरपालिका यावर काही ठोस पाऊल उचलणार का?
“हे मुलांच्या सुरक्षेशी खेळ आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेने यावर कठोर कारवाई करायला हवी.”-अंकुश (पालक)
"खेळताना आम्हाला मैदानात खिळे दिसले, त्यामुळे खेळताना खूप त्रास झाला. सुरक्षेचा विचार केला पाहिजे होता.”-हर्षिता तरे (नाझरथ शाळा)
Watch full video on Below link:
https://www.instagram.com/reel/DAtD3EmsZM3/?igsh=MXdhcHUxbHd3eHFrYw==
What's Your Reaction?






