मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल–जुलै 2025 कालावधीत विक्रमी माल वाहतूक नोंदवली

मुंबई, 2 ऑगस्ट 2025 – मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीत 7.43 दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली असून, ही मागील 15 वर्षांतील सर्वोच्च नोंद आहे. मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या 7.32 दशलक्ष टन लादणीच्या तुलनेत यंदा 1.5% वाढ झाली आहे.
जुलै 2025 मध्ये 2.04 दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली असून, ही जुलै महिन्यासाठीची मागील 15 वर्षांतील सर्वात जास्त लादणी आहे. मागील वर्षीच्या 1.88 दशलक्ष टन लादणीच्या तुलनेत यावर्षी 8.5% वाढ झाली आहे. तसेच, चालू आर्थिक वर्षात पहिल्यांदाच एका महिन्यात माल लादणीने 2 दशलक्ष टनांचा टप्पा ओलांडला आहे.
JNPT बंदरातून 647 कंटेनर रेक्स लादण्यात आल्या असून, हे आतापर्यंतचे सर्वोच्च लादणीचे प्रमाण आहे. मुंबई विभागात एकूण 769 कंटेनर रेक्स (647 पोर्ट व 122 घरगुती) लादण्यात आल्या, ज्यामध्ये जानेवारी 2025 चा 754 रेक्सचा विक्रम मोडीत काढला आहे. दररोज 1048 कंटेनर वॅगन, तर 28 जुलै 2025 रोजी 1285 कंटेनर वॅगन्स लादण्यात आल्या — हे दोन्ही विक्रमी आकडे आहेत.
1614 वॅगन्स दररोज लादण्यात आल्या असून, ही लादणी 15% अधिक आहे. कोळसा वाहतुकीतही 68 रेक्स लादण्यात आल्या आहेत, ज्या मागील वर्षीच्या तुलनेत 41% जास्त आहेत. कलांबोली गुड्स शेड मधून 32 खत रेक्स जुलै 2025 मध्ये लादण्यात आल्या — ही एक महिन्याची सर्वोच्च लादणी आहे.
1145 रेक्स लादण्यात आणि 1104 रेक्स उतरवण्यात आल्या असून, त्या अनुक्रमे 12% व 21% वाढ दर्शवतात. एप्रिल ते जुलै 2025 दरम्यान 4100 रेक्स लादण्यात आल्या व 4200 रेक्स उतरवण्यात आल्या आहेत.
मालगाड्यांच्या देवाणघेवाणीतही वाढ झाली असून, जुलै 2025 मध्ये दररोज 110.6 गाड्यांची देवाणघेवाण झाली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. वसई रोड (पश्चिम रेल्वे) सोबतची 57.2 गाड्यांची देवाणघेवाण ही जून 2025 मधील विक्रमापेक्षा अधिक आहे.
What's Your Reaction?






