मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आनंद रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा मंजूर

मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आनंद रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा मंजूर

मुंबई: मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला एक महत्त्वाचा आणि आनंददायक अपडेट मिळालं आहे. सध्या मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आनंद रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आनंद व आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील एक अत्याधुनिक, स्वदेशी बनावटीची सेमी हाय-स्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन २०१९ मध्ये पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात वंदे भारत एक्सप्रेस ११ महत्त्वाच्या मार्गांवर धावत आहे.

वसई, नालासोपारा, विरार, अहमदाबाद, मडगाव, शिर्डी, सोलापूर, पुणे, हुबळी, नागपूर अशा विविध मार्गांवर ही गाडी सुरू असून, आगामी काळात आणखी काही मार्गांवर ही गाडी धावणार आहे.

विशेष म्हणजे, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आनंद येथे एक अतिरिक्त थांबा मिळवण्यासाठी खासदार मितेश पाटील यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे प्रभावी सादरीकरण केल्यानंतर, रेल्वे मंत्रालयाने या गाडीला आनंद स्थानकावर थांबा मंजूर केला आहे.

सध्या या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वापी, बोरीवली या स्थानकांवर थांबते. मात्र आनंद रेल्वे स्थानकावर थांबा देण्याच्या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना सुविधा मिळेल अशी अपेक्षा आहे.

तथापि, रेल्वे प्रशासनाने या अतिरिक्त थांब्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. तसेच, या निर्णयामुळे गाडीच्या वेळापत्रकात कधी बदल होईल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आनंद स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस कधीपासून थांबणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आशा आहे की, या निर्णयामुळे आनंद आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांना सुविधा मिळून, त्यांना गाडीचा लाभ मिळेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow