मुख्यमंंत्र्याच्या कृतीवर विरोधकांची टिका रुग्णालयाचे उदघाटन ऑनलाईन, कार्यालयासाठी मात्र प्रत्यक्ष हजर

मुख्यमंंत्र्याच्या कृतीवर विरोधकांची टिका रुग्णालयाचे उदघाटन ऑनलाईन, कार्यालयासाठी मात्र प्रत्यक्ष हजर

वसई- वसईतील पालिकेच्या सर डी एम पेटीट रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोर येथून ऑनलाईन पध्दतीने केले. मात्र नंतर याच वसईत येऊन आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्यालयाचे उदघाटन केले. मुख्यमंत्र्यांना रुग्णालयासाठी वेळ नाही मात्र राजकीय पक्षासाठी भऱपूर वेळ आहे अशी टिका विरोधकांनी केली आहे. पालिकेने वसईच्या सर डी एम पेटीट रुग्णालयाची विस्तारीत इमरात तयार केली आहे. २०२० मध्ये या इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले होते. 

५ वर्षानी हे रुग्णालय तयार झाले आहे. मात्र त्याच्या उद्घटनासाठी वेळ नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे पालघर येथील मनोर मधील कार्यक्रमादरम्यान या रुग्णालयाचे उद्गघाटन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. परंतु काही वेळेतच मुख्यमंत्री वसईत आमदा स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्यालयाच्या उदघाटनासाठी आले. हे रुग्णालया येथून काही अंतरावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे प्राधान्य रुग्णालय नसून राजकारण आहे अशी टिका विरोधकांनी केली आहे. विशेष म्हणजे कार्यालय उदघटनाचा कार्यक्रमाच नंतर समावेस करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow