वसई: बहुजन विकास आघाडीत सुरू असलेल्या राजकीय गोंधळाला अखेर थोडी स्थिरता मिळाली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांचे बंधू राजीव पाटील यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बहुजन विकास आघाडीत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
काही दिवसांपूर्वी, राजीव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा इशारा दिला होता आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, त्यांच्या ८९ वर्षीय मातोश्रींच्या भावनिक आवाहनामुळे त्यांनी आपला निर्णय बदलला.
मातोश्रींनी त्यांच्या बंडामुळे नाराज होऊन जेवण सोडले होते आणि संवादही थांबवला होता. “आपल्याच भावा आणि पुतण्याविरुद्ध का लढतोय?” या भावनिक विचारांनी राजीव पाटील यांना निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडले.
भाजपमध्ये त्यांच्या संभाव्य प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठा विरोध निर्माण झाला होता. परंतु आता, राजीव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बहुजन विकास आघाडीत एकात्मता आणि शांतता परतली आहे.
राजीव पाटील यांनी स्पष्ट केले, “कुटुंबातील चर्चेनंतर मी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.”
या निर्णयामुळे वसईतील राजकारणात मोठा बदल झाला आहे आणि बहुजन विकास आघाडीमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
आईची भावनिक ओडर
राजीव पाटील यांच्या मातोश्री या ८९ वर्षांच्या आहेत. राजीव पाटील यांच्या बंडामुळे त्या कमालीच्या नाराज झाल्या होत्या. त्यांनी जेवण सोडलं होतं तसेच राजीव पाटील यांच्याशी बोलणंही टाकलं होतं, अशी माहिती सुत्रांनी दिली. सर्व आपले कुटुंब आहे. आपल्याच भावा आणि पुतण्यासमोर का लढतोय? हे योग्य नाही अशी भावनिक साद घालत पाटील यांच्या आईने समजूत काढली. शुक्रवारी राजीव पाटील यांच्या दोन्ही बंधूनी कौटुंबिक बैठक घेऊन या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले.
Previous
Article