राजेश पाटील हे जागरुक लोकप्रतिनिधी; त्यांनाच विजयी करा - माजी महापौर राजीव पाटील

राजेश पाटील हे जागरुक लोकप्रतिनिधी; त्यांनाच विजयी करा - माजी महापौर राजीव पाटील

बोईसर - विधानसभा निवडणूका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे. बोईसर विधासभा मतदारसंघाचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचार सभेत भाषण करताना प्रथम महापौर राजीव पाटील म्हणाले की, आपले प्रश्न मांडण्यासाठी जागरूक लोकप्रतिनिधीची गरज असते आणि राजेश पाटील हे जागरूक लोकप्रतिनिधी आहेत." त्यानंतर, पाटील यांनी बोईसर विधानसभा क्षेत्रात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांसोबत सभा आणि बैठका घेतल्या. पाटील यांनी राजेश पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करताना आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख केला. तसेच उमेदवाराच्या अनुभवावर विश्वास ठेवून, त्यांना निवडून द्यावे अशी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. राजीव पाटील यांनी बैठकीत सांगितले की, "बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी आपल्या कार्यकाळात शासनाच्या योजना आपल्या मतदारसंघात राबवल्या.

त्यात आदिवासी व ओबीसी समाजासाठी अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांनी केलेले कार्य प्रशंसनीय असून, त्यांचा अनुभव कामी येईल." असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय, राजीव पाटील यांनी नालासोपारा मतदारसंघात देखील कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन विधासभा निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, बहुजन विकास आघाडीच्या प्रचाराला वेग प्राप्त झाला आहे. सध्या राजीव पाटील बहुजन विकास आघाडीच्या कार्याध्यक्ष पदावर कार्यरत असून, आगामी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी आपल्या संपूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow