राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक

मुंबई:राहुल गांधी यांनी देशात आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात मीरा-भाईंदर शहरातील शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. भाईंदर पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खाली शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान 'राहुल गांधी होश में आओ, इटली जाओ' अशा घोषणा देण्यात आल्या. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी यापुढे अशी वक्तव्ये केली तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जाईल. या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाने त्यांच्या नाराजीची भूमिका मांडली आहे आणि राहुल गांधी यांनी त्यांच्या वक्तव्यावर खुलासा करावा अशी मागणी केली आहे.

सचिन मांजरेकर (शिवसेना शिंदे गट):"राहुल गांधी यांचे वक्तव्य आपल्या देशाच्या संविधानिक व्यवस्थेच्या आणि आरक्षणाच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. त्यांनी अशा प्रकारे पुन्हा वक्तव्ये केली तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजवू."

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow