वसईत कचरा वेचणाऱ्या 45 वर्षीय इसमाची हत्या; हत्या करणाऱ्या 75 वर्षीय इसमाचाही मृत्यू

वसई :1 नोव्हेंबर (शुक्रवार ) रोजी वसईमध्ये 45 वर्षीय कचरा वेचणाऱ्या राजूची 75 वर्षीय वृद्ध प्रकाश मेरवा यांनी कथितरित्या हत्या केली. पोलीसांच्या माहितीनुसार, ही घटना वसईच्या एका फुट ओव्हरब्रिजजवळ झाली, जिथे दोघांमध्ये झटापट झाल्यानंतर मेरवाने राजूला बेदम मारहाण केली. त्यानंतर, त्याने राजुचा मृतदेह जाळून टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिक पोलिसांना जळत्या आगीची माहिती मिळाल्यानंतर, घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना अंशतः जळलेले शव सापडले.
प्राथमिक तपासात वसई सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली मात्र घटनास्थळी रक्ताचे डाग आढळल्यानंतर मृतदेहाचे परीक्षण करण्यात आले. त्यात डोक्याला जबर मार लागून हत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर पुढील तपासाला सुरुवात केली.
तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तिथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली. सहाय्यक पोलीस आयुक्त (जीआरपी) किशोर शिंदे यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी राजू सोबत 25 वर्षीय अंकिता टेनीराम आणि 35 वर्षीय बबन चन्ना रॉय या नावाचे कचरा वेचणारे उपस्थित होते. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू आणि मेरवा यांच्यामध्ये दारूच्या नशेत वाद झाला होता, ज्यात राजुने बांबूच्या काठीने मेरवावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मेरवाने तीच काठी घेऊन राजूवर हल्ला करत त्याचा जीव घेतला.
आरोपींच्या जबाबानंतर पोलिसांनी मेरवाचा तपास सुरु केला. मात्र तपासा दरम्यान घटना घडली त्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी मेरवा याचा ह्रदय विकाराच्या झटक्याने वालिव पोलीस स्टेशन क्षेत्रात मृत्यू झाला होता.
What's Your Reaction?






