वसईत महावितरणचा वीज चोरांना दणका:दहा लाख ९९ हजार रूपयांची विज चोरी पकडली.

वसई :वसई पारनाका महावितरण कार्यालया मार्फत वीज चोरी करणाऱ्यां विरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. वसई विभागात विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत २७ विज चोऱ्या पकडण्यात आल्या.
अधिक माहितीनुसार, वसईत घरगुती वीज जोडणी मधून बेकायदेशीर रित्या वीज वापर करणाऱ्याना महावितरणने दणका दिला आहे. खोचीवडे, पाणजु, वाघरीपाडा वाल्मिकी नगर या वेगवेगळ्या विभागात महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाडी घातल्या. यात घरगुती वापराच्या वीज जोडणीतून वीज चोरी करीत असल्याचे दिसून आले. एकूण २७ ठिकाणी अशा स्वरूपाच्या वीज चोऱ्या पकडण्यात आल्या आहेत. ६९ हजार ९२० युनिटची चोरी या मोहिमेतुन उघडकीस आली असून, याकरिता दहा लाख ९९ हजार १३० रुपये इतकी विज चोरी असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता कृष्णकांत झारकर यांनी दिली. वसई उपविभागात सध्या १३.८७ इतकी वीज गळती आहे.
आगामी काळात ही मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांनी
आपल्या विभागात अशा स्वरूपाच्या वीज चोऱ्या सुरू असतील तर, त्याची माहिती तात्काळ महावितरण कार्यालयाला देण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
अधीक्षक अभियंता संजय खंदारे, मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, कार्यकारी अभियंता प्रवीण सुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या कारवाया करण्यात आल्या.
What's Your Reaction?






