वसई विरार करोनाचा पहिला बळी नायगाव मधील इसमाचा करोनामुळे मृत्यू

वसई विरार करोनाचा पहिला बळी नायगाव मधील इसमाचा करोनामुळे मृत्यू

वसई: नायगाव जवळील खोचिवडे येथे राहणार्ृया ४३ वर्षीय इसमाचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला. विनित किणी असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. त्याची कोवीड चाचणी सकारात्मक आली होती. त्यातच त्याला न्युमोनिया झाल्याने उपचारासाठी मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून करोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. मागील आठवड्यात वसईत एक करोना रुग्ण आढळळा होता. त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झालं होतं. नायगावच्या खोचिव़डे गावात राहणार्‍या विनित किणी (४३) याला त्याला अचानक ताप आला. दरम्यान त्याला न्युमोनिया झाला आणि श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्याला वसईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्याला माहिम येथील रहेजा रुग्णालयात जाखल करण्यात आले. तेथे करण्यात आलेल्या चाचणीत त्याला कोव्हीडचे निदान झाल्याचे आढळून आले.

मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनामुळे मृत्यू झाल्याने त्याच्या मृतदेह घरी न नेता थेट पाचूबंदर येथील स्मशानभूमीत आणून अंत्यसंस्कार कऱण्यात आले. सदर रुग्ण हा नायगाव मधील असला तरी वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील नव्हता. त्याला न्युमोनियाचा झाला होता. त्याला श्वसनासाठी त्रास होऊ लागाल होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले. आम्ही खबरदारी घेत असून नागरिकांनी करोनाच्या संदर्भात लक्षणे आढळून आल्यास तातडीने करोना चाचणी करवून घ्या असे आवाहन पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी केले आहे. —----------- खोचिवडे गावात घबराट विनित किणी हा गेल्या काही दिवसांपासून सर्व सार्वजनिक कार्यक्रमात वावरत होता. त्यामुळे गावातील नागरिक आणि नातेवाईकांमध्ये घबराट पसरली आहे. पालिकेने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. —-----------

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow