विद्यार्थ्यांनी घेतला निवडणूक प्रक्रियेचा अनुभव छत्रपती इंग्लिश स्कूलचा अभिनव उपक्रम

विद्यार्थ्यांनी घेतला निवडणूक प्रक्रियेचा अनुभव  छत्रपती इंग्लिश स्कूलचा अभिनव उपक्रम

वाडा:लोकशाही, निवडणूक, मतदान याबाबत मुलांमध्ये कमालीचे औत्सुक्य असते. लोकशाही म्हणजे काय? कशी असते निवडणूक प्रक्रिया? कसे होते मतदान? कशी होते मत मोजणी? एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. विद्यार्थ्यांच्या मनातल्या या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शिरीषपाडा येथील छत्रपती इंग्लिश मेडीयम स्कूल येथे मोबाईल अप च्या माध्यमातून शालेय विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीचा उपक्रम पार पडला.
प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी असणाऱ्या बॅलेट युनिट, मतदान यंत्र, आदी साहित्य मोबाईल आप द्वारे उपलब्ध केले. विद्यार्थ्यांमधूनच मतदान अधिकारी, मतमोजणी अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिपाई तसेच उमेदवार  निश्चित करून त्यांना त्यांच्या कामाचे स्वरूप समजावण्यात आले. मतदार विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेप्रमाणे बॅलेट युनिटचा येणारा बिप आवाज, विद्यार्थी पोलीस कर्मचारी, मतदान अधिकारी, उमेदवारांचा प्रचार या सर्व बाबींचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. 
मतदान हा आपला अधिकार आहे. मत विकणे म्हणजे स्वतःला विकणे होय, आपली लोकशाही सुदृढ व सक्षम राहण्यासाठी आपणा सर्वांचे प्रामाणिक प्रयत्न महत्वाचे आहेत असा संदेश या उपक्रमातून देण्यात आले असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका भक्ती कवळे यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow