शेतकऱ्यांसमोर मजुर तुटवड्याचे आव्हान ,लाडकी बहीण कागदपत्र गोळा करण्यात व्यस्त .

शेतकऱ्यांसमोर मजुर तुटवड्याचे आव्हान ,लाडकी बहीण कागदपत्र गोळा करण्यात व्यस्त .

वसई,सध्या वसईत भात लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी राजा मजुरांच्या शोधात आहे. मात्र यंदा शेतकऱ्यांना शेतीसाठी मजूर मिळत नसल्याने मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनाच आपल्या घरातील महिलांना, सदस्यांना भातलागवडीसाठी शेतात उतरावे लागत आहे. दरम्यान, सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सर्वसामान्य शेतमजूर महिला कागदपत्रं गोळा करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे या महिलांनी यंदा भातलागवडीकडे पाठ फिरवली आहे.

वसई पूर्व ग्रामीण भागात आदिवासी पाड्यांत मोठ्या प्रमाणात महिला शेतमजूर आहेत. या महिला दरवर्षी शेतमजुरीतून चांगला रोजगार प्राप्त करतात. प्रत्येक मजुरामागे 350 रूपये ते 400 रूपयांची मजुरी, जेवण असे मजुरीचे स्वरूप असते. यंदा मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ग्रामीण भागातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असून त्यासाठी या महिला कागदपत्रं गोळा करण्यात व्यस्त आहेत. दर महिन्याला 1500 रूपये खात्यावर जमा होणार असल्याने बँकेत खाते नोंदणी करण्यापासून ते बारीकसारिक कागदपत्रे गोळा करण्यात या महिला प्रचंड व्यस्त असल्याचे दिसते.

दरम्यान, ठिकठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. तर महाई सेवा केंद्र तसेच वसईच्या सेतू कार्यालयात महिला दाखले मिळवण्यासाठी गर्दी करू लागल्या आहेत. या सर्वसामान्य शेतमजूर महिला यंदा लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे गोळा करण्यात व्यस्त झाल्याने शेतकऱ्यांपुढे मजुर तुटवड्याचे आव्हान आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow