वसई विरार, मीरा-भाईंदरला अमली पदार्थाचा विळखा ,76 गुन्ह्यांत 334 कोटींचा मुद्देमाल जप्त ,92 पान टपऱ्यांवर कोप्ता कायद्यांतर्गत कारवाई.

वसई विरार, मीरा-भाईंदरला अमली पदार्थाचा विळखा ,76 गुन्ह्यांत 334 कोटींचा मुद्देमाल जप्त  ,92 पान टपऱ्यांवर कोप्ता कायद्यांतर्गत कारवाई.

वसई,मीरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अमली पदार्थ तस्करी व विक्रीचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले गेले आहे. अमली पदार्थाच्या विळख्यात शाळकरी व महाविद्यालयीन तरूणाई गुरफटली जाऊ नये याकरिता  पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवायांना सुरूवात केली आहे.

दरम्यान गेल्या 6 महिन्यांत पोलिसांनी सदर प्रकरणी कारवाया करून 76 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून सुमारे 334 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 92 पान टपऱ्यांवर कोप्ता कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, मीरारोड-भाईंदर, वसई विरार परिसरात अमली पदार्थांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. शाळा-महाविद्यालयानजिक असलेल्या पान टपऱ्यांवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यात गुटखा, सिगारेट, मावा तसेच काही पान टपऱ्यांवर तर अमली पदार्थांचीदेखील विक्री होत असल्याचे चित्र आहे.

याबाबत पोलिसांनी तरूणाईला अमलीख पदार्थाचा विळखा बसन्यापासून वाचवण्यासाठी कारवाईची मोहिम तिव्र केली आहे. गेल्या सहा महिन्यांत अमली पदार्थ विरोधी कारवायांना मोठ्या प्रमाणात जोर आला असून  गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी सुमारे 76 गुन्ह्यांत 334 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवायांवरून वसई विरार व मिरा-भाईंदरमध्ये अमली पदार्थांचे स्तोम किती वाढले आहे. त्याचा प्रत्यय येतो. दरम्यान, अशा सववरूपाच्या गुन्ह्यांचे समुळ नष्ट करण्यासाठी पोलिसांना नजिकच्या काळात मोठ्या प्रमाणात कारवाया कराव्या लागणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow