हरियाणात सकाळी 9 वाजेपर्यंत 9.53 टक्के मतदान

हरियाणात सकाळी 9 वाजेपर्यंत 9.53 टक्के मतदान

चंदीगड : हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी आज, शनिवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 9.53 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हरियाणात सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता मतदान रांगेत असलेल्यांना मतदानाचा हक्का बजावता येणार आहे. राज्यात एकूण 1031 उमेदवार रिंगणात असून त्यात 930 पुरुष आणि 101 महिला उमेदवारांचा समावेश आहे. राज्यातले 2 कोटी 3 लाख मतदार या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबर रोजी जाहीर होतील. गेल्या निवडणुकीत राज्यात 67.74 टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाने 75 टक्के मतदानाचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सकाळी 7.30 वाजता मतदानाचा हक्क् मबजावला. मतदानापूर्वी मुख्यमंत्र्यांनी गुरुद्वारा साहिब येथे जाऊन दर्शन केले. यासोबतच भाजप उमेदवार आणि माजी मंत्री देवेंद्र सिंह बबली यांनी देखील आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow