Virar : ज्वेलर्समधून सोने चोरणाऱ्या सराईत महिला चोराला नालासोपाऱ्यातून अटक

सराईत महिला चोरावर मुंबई, पालघर आणि पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या आधी पुण्यातील पिपरी चिंचवड येथे चोरीच्या अशाच प्रकरणामुळे अटक करण्यात आली होती.

Virar :  ज्वेलर्समधून सोने चोरणाऱ्या सराईत महिला चोराला नालासोपाऱ्यातून अटक

विरार, मीरा भाईंदर - महिन्यभरापूर्वी एका महिलेने विरारमधील एका प्रतिष्ठित दागिन्यांच्या शोरूममधून सोन्याचे दागिने चोरले होते. एक महिन्यांनंतर चोरीचा उलगडा करण्यास मीरा-भाईंदर-वसई विरार (MBVV) संलग्न गुन्हे शाखा युनिटला (झोन III) यश आहे. चोरीत या महिलेचा सहभाग असल्याचे उघड झाल्यांनतर पोलिसांनी सदर महिलेला अटक केली आहे. विद्या गंगाधर थोरात (53) अशी या महिलेची ओळख पटली असून तिच्यावर मुंबई, पालघर आणि पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोरूमच्या व्यवस्थापकाने 10 नोव्हेंबर रोजी विरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती, की त्यांच्या नियमित यादीच्या तपासणीत रु.34,608 किमतीच्या 21 सोन्याच्या नोज पिन गायब असल्याचे आढळून आले होते. क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेरे तपासल्यानंतर, त्यांना 5 नोव्हेंबर रोजी एक संशयास्पद दिसणारी महिला दुकानात फिरताना दिसली. दागिने निवडण्याच्या बहाण्याने तिने घाईघाईने दुकानातून बाहेर पडण्यापूर्वी हाताने 21 सोन्याचे नॉज पिन असलेले पाकीट चोरले. सीसीटीव्ही तपासानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. 

इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या माध्यमातून पाळत ठेवून दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिस निरीक्षक- प्रमोद बधाख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी (17 डिसेंबर) रोजी विद्या थोरात यांना नालासोपारा येथून पकडले. 2020 मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या शोरूममध्ये अशाच प्रकारच्या चोरीप्रकरणी विद्याला सांगवी पोलिसांनी (पिंपरी-चिंचवड) अटक केल्याचे तपासात समोर आले आहे. ती सध्या जामिनावर बाहेर होती. आतापर्यंत अर्धा डझनहून अधिक प्रकरणांमध्ये तिचा सहभाग उघडकीस आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, विद्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 305 (अ) नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास विरार पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow