अडीच वर्षाच्या चिमुकलीचा बलात्कारानंतर मृत्यू मुलीच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक

मुंबई- मालवणी येथे नात्याला काळीमा फासवणारी आणि अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. अडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार केल्याने वेदनेमुळे मृत्यू झाला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आईसमोरच बलात्काराची ही घटना घडली. याप्रकरणी मालवणी पोलिसामी चिमुकल्या मुलीच्या आईसह बलात्कार करणार्या तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आऱोपी महिला ३० वर्षांची असून मालवणी येथे राहते. तीन वर्षांपूर्वी तिचा पती तिला सोडून गेला होता. त्यावेळी ती गर्भवती होती.
दरम्यान तिने एका मुलीला जन्म दिला. तिची मुलगी अडीच वर्षांची आहे. या काळात या महिलेचे याच परिसरात राहणार्या १९ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. शनिवारी रात्री या महिलेचा प्रियकर तिच्या घरी आला आणि दोघांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर तिच्या प्रियकराने अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला. त्यावेळी महिलेने संमती दिली आणि तिच्या समोरच हा घृणास्पद प्रकार घडला. या नंतर जखमी झालेल्या चिमुकलीलाल जनकल्याण नगर येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे मुलीला आजार असल्याची थाप मुलीच्या आईने मारली. मात्र मुलीवर लैंगित अत्याचार झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. याबाबत रुग्णालयाने मालवणी पोलिसांना माहिती दिली. मालवणी पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकरावर बलात्कार तसेच पोक्सोच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
What's Your Reaction?






