अमरावती शहरासह ग्रामीण भागात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झपाटणे वाढत आहे. मागील सात महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. मात्र १ ते १४ ऑगस्ट या १४ दिवसात डेंग्यूचे ८८ रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते जुलैदरम्यान डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ११० होती, अशी माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाने दिली आहे. याशिवाय खासगी रुग्णालयात कीटकजन्य आजाराचे रुग्णही दाखल होत आहे. मनपाची आरोग्य यंत्रणा सतर्क झालीआहे.
आरोग्य विभागाकडून विविध पथके नेमून शहरात विविध ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातही विविध उपाययोजना करण्यात येत आहे.गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे शासकीय रुग्णालयातील गर्दीवरून दिसून येत आहे. त्याबरोबरच जलजन्य तसेच कीटकजन्य आजारांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जिल्ह्यातील वातावरण बदलामुळे निर्माण झालेले दमट वातावरण हे या कीटकजन्य वाढीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी ताप, डोके दुखी, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे यासारख्या लक्षणांवर दुर्लक्ष न करता तातडीने रुग्णालयात जाऊन रक्ताची चाचणी करण्याची गरज आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात ग्रामीण भागात डेंग्यूचे ६८ आणि मनपा क्षेत्रात २० असे एकूण तब्बल ८८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. तर चिकनगुन्याचे ग्रामीण भागात ४० आणि मनपा क्षेत्रात १८ असे एकूण ५८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा हिवताप विभागाने दिली. १४ ऑगस्टपर्यंत २१ रुग्ण मलेरियाचे आढळले जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांबरोबरच मलेरियाचे देखील रुग्ण आढळून आले आहेत. १४ ऑगस्टपर्यंत मलेरियाचे २१ रुग्ण आढळले आल्याची माहिती हिवताप विभागाने दिली. कीटकजन्य आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी एक दिवस कोरडा पाळावा, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, डास चावणार नाही, अशा साधनांचा वापर करावा, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, ताप आल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. सात महिन्यात डेंग्यूचे रुग्ण ११०; २४४ नमुने तपासले जिल्ह्यात जानेवारी ते ३१ जुलै या सात महिन्यात १ हजार ६६ संशयित रुग्णांचे नमुने तपासले. यामध्ये ११० डेंग्यू पॉझिटिव्ह, तर ४० चिकनगुनिया रुग्ण आढळले होते. तर १ ते १४ ऑगस्ट या काळात २४४ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासले असता, यामध्ये ८८ डेंग्यू तर ५८ चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंग्यू रुग्णांची एकूण संख्या ही १९८, तर चिकनगुनिया रुग्णांची संख्या ९२ झाली आहे..
अमरावतीत धोक्याची घंटा; 14 दिवसांत डेंग्यूचे 88, तर चिकनगुन्याचे 58 रुग्ण.
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
तुमच्या तीन पिढ्यांमध्ये 370 परत आणण्याची शक्ती नाही”- अमित शाह
जम्मू:जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने ...
गुजरातची रिया सिंघा नवी 'मिस युनिव्हर्स इंडिया'
नवी दिल्ली:गुजरातच्या रिया सिंघाने मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा कित...
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक; चॅनलवर क्रिप्टो करन्सीची जाहिरात झळकली
नवी दिल्ली: भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल आज, शुक्रव...
Previous
Article