छत्रपती संभाजीनगर:राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयी- सुविधा उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. 'चिठ्ठीमुक्त घाटी' या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाचे कौतुक केले.
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज भेट देऊन अतिविशेषोपचार रुग्णालयाची पाहणी केली आणि डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, खासदार कल्याण काळे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ.अजय चंदनवाले, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे उपस्थित उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तुम्ही सगळे डॉक्टर सामान्यांसाठी विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडतात. अडीच वर्षांपूर्वी आमचं सरकार आलं तेव्हापासून सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून निर्णय घेत आलो आहोत. आरोग्याच्या क्षेत्रातही सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही निर्णय घेतले आहेत. राज्यातील सामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पुढाकार घेतला आहे. आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर आमचा भर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांना ५ हजार रुपये दरमहा सुधारित मानधन देण्याचा निर्णय घेतला असून वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, सद्यस्थितीमध्ये अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या इमारतीमध्ये बाहयरुग्ण विभाग, कक्ष, आय.सी.यु. शस्त्रक्रियागृहे इत्यादी सेवा युरॉलॉजी, न्युरोसर्जरी, कार्डियॉलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी, अशा प्रकराच्या अतिविशेषोपचार सेवा सुरु केलेल्या आहेत. यासेवेचा लाभ मराठवाडयासह बुलढाणा, वाशिम, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर अशा एकूण १४ जिल्ह्यामधून येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांना फायदा होत आहे.
घाटी रुग्णालयाचा मराठवाड्यातील लाखो रुग्णांना फायदा होतोय. ज्यावेळी हे महाविद्यालय सुरु झाले त्यावेळी फक्त ५० विद्यार्थी क्षमता होती व रुग्णखाटांची संख्या ३०० होती. आता विद्यार्थी क्षमता २०० इतकी झालेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत राज्य कर्करोग संस्थाही कार्यान्वित आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून डॉक्टर रुग्णांना जीवदान देण्याचे काम करतात. रुग्णांच्या तसेच त्यांच्या कुंटूबियांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम डॉक्टर करतात. त्यामुळे शासन डॉक्टरांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीला प्राधान्य देत आहे. सुपरस्पेशॅलीटी सर्जिकल हॉस्पीटलसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधीचे पत्र प्राप्त होताच गरजूंना तात्काळ निधी देण्यात येत असून राज्यात दोन वर्षात 350 कोटी रुपये गरजू रुग्णांना उपचारासाठी देण्यात आले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दिड लाखावरून पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील सर्वांना सामावून घेण्यात आले आहे. आपले राज्य आरोग्य सेवेत अधिक प्रगत कसे करता येईल यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून डॉक्टरांच्या मागण्या तत्परतेने पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी केले. सुक्रे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना ते आतापर्यंतचा प्रवास याबाबत माहिती दिली. मार्ड संघटनेचे अध्यक्ष रोहन गायकवाड यांनी मनोगतात राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहिले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य केल्याबद्दल नवजात शिशू विभागाचे डॉ. एल. एस. देशमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या डॉ. ज्योती बजाज, स्त्री रोग विभागाचे डॉ. श्रीनिवास गडप्पा, यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टर, विभाग प्रमुख, यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर - मुख्यमंत्री
अखेर दहा वर्षांनी होणार महात्मा गांधींच्या अर्धपुत...
भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्याचा दहा वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०१६ रोजी माजी विरोधी पक्षनेते आसिफ ...
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
सिंधुदुर्ग - दारूसह ५० लाखाचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
सिंधुदुर्ग: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या केल्याप्रकरणी राज...
महाराष्ट्रात एनआयए व एटीएसची छापेमारी दहशतवादी कनेक्शन प्रकरणी तिघे ताब्यात
छ. संभाजीनगर : दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे आणि विघातक कृत्यात ...
अल्पवयीन मुलीची तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (साताऱ्यात तणाव, पोलीस अधीक्षकांचे कठोर कारवाईचे आदेश)
सातारा : सातारा शहरात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीने गोंदवले येथे युवका...
Previous
Article