देशातलं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याचा मान मला मिळाला - हसन मुश्रीफ

देशातलं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याचा मान मला मिळाला - हसन मुश्रीफ

कोल्हापूर:वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत देशात पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स (उत्कृष्टता केंद्र ) उभारण्याचा मान मिळाला असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सांगाव या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत 100 बेडचे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

शासनाकडून 287 कोटी रूपये आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय साठी, 100 बेडचे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी 100 कोटी, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय साठी 248 कोटी रुपये मंजूर झाले होते. या तीनही कामांचे भूमिपूजन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांच्याहस्ते सांगाव, कागल येथे संपन्न झाले. यावेळी आयुष संचालनालयाचे संचालक डॉ.रमन घुंगराळेकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी न.रा.पाटील, अधिष्ठाता डॉ.वीणा पाटील, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसिलदार अमरदीप वाकडे, अधिष्ठाता भाग्यश्री खोत, सरपंच राजकुमार पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेंटर ऑफ एक्सलन्स ही एक अशी संस्था आहे जी विशिष्ट क्षेत्रासाठी नेतृत्व, सर्वोत्तम पद्धती, संशोधन, समर्थन, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देत असते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या अखत्यारितील महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संसोधन संस्था ही मुख्य उत्कृष्टता केंद्र असेल. यासाठी 70 कोटी 75 लाख रुपये इतक्या खर्चास नुकतीच मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या केंद्रांच्या कार्यान्वयानासाठी कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 8 अंतर्गत कंपनी स्थापन करण्यात येणार आहे.

यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, कागलच्या मौजे सांगाव येथील माळावर तीन विभागातील वेगवेगळ्या कामांचा शुभारंभ होत आहे. याठिकाणी आयुर्वेद महाविद्यालय, रूग्णालय व आरोग्य प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यामुळे कोणालाही जिल्हा रूग्णालयात जायाची गरज पडणार नाही. सर्व प्रक्रिया पुर्ण झाली असून येत्या दोन वर्षात सर्व इतारती कार्यन्वित होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी राज्यात सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या वैद्यकीय सुविधांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मला मिळालेल्या कार्यकाळात 12 नवीन एमबीबीएस विद्यालये सुरू केली जी राज्याच्या निर्मिती पासून फक्त 23 होती. प्रवेश क्षमता आत्तापर्यंत 75 वर्षात 3850 होती ती 1000 ने वाढवून 4850 केली. रूग्णालयातील खाटांची संख्याही 4300 ने वाढविली. तसेच देशात शासकीय योग व निसर्गोपचार विद्यालयही नव्हते ते आपण कोल्हापूरमध्ये सुरू केल्याचे सांगितले.

उद्घाटक कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाला खऱ्या अर्थाने हसन मुश्रीफ यांनी गती दिल्याचे सांगितले. त्यांनी राज्यातील विविध वैद्यकीय सुविधा सुरू करण्यासाठी धावपळ करून सर्व प्रक्रिया पुर्ण करण्याचे योगदान दिले, असे सांगितले. तसेच बोलताना त्यांनी आयुर्वेद हे मानवाच्या स्वास्थाकडे लक्ष देणारं शास्त्र असल्याचे सांगितले. संचालक रमन घुंगराळेकर यांनी एकाच ठिकाणी आयुर्वेद, ॲलोपॅथी व होमोओपॅथी अशा सेवा मिळणार असल्याचे सांगून याठिकाणी येथील पैलवानांना आहार आणि उपचार याबाबत मार्गदर्शन करणारी एक शाखाही सुरू करणार असल्याचे सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow