ई-चालान शिकायतों में 59% हुईं खारिज – RTI से खुलासा

मुंबई ट्राफिक पोलिसांनी ‘वन स्टेट वन चलन’ डिजिटल पोर्टलद्वारे १ जानेवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान तब्बल ₹५५६.४२ कोटी (₹५,५६४,२१९,०५०) इतकी दंड रक्कम वसूल केली आहे. ही माहिती आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात मागविल्यानंतर उघड झाली आहे.
या काळात एकूण १,८१,६१३ ऑनलाईन तक्रारी ई-चलनविरोधात दाखल झाल्या होत्या, त्यापैकी १,०७,८५० तक्रारी फेटाळल्या गेल्या आहेत. म्हणजेच सुमारे ५९% तक्रारी अमान्य ठरल्या आहेत.
मुंबई ट्राफिक पोलिसांनी स्पष्ट केले की पोर्टलवर वाहनप्रकारानुसार (दुचाकी, चारचाकी, मालवाहू, प्रवासी वाहन इ.) तक्रारींचे वर्गीकरण सध्या होत नाही. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या वाहनांवर कारवाई जास्त होते, हे समजणे कठीण आहे.
तक्रार पडताळणी प्रक्रिया:
सर्व तक्रारी वर्ली येथील ट्राफिक मुख्यालयातील मल्टीमिडिया सेलमध्ये तपासल्या जातात. वाहन आणि परिसराचे फोटो स्पष्ट असतील, तर त्यानुसार निर्णय घेतला जातो. जर पुरावे अपुरे किंवा संदिग्ध असतील, तर तक्रार संबंधित ट्राफिक विभाग किंवा पोलीस ठाण्याकडे पाठवली जाते. त्यांच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेतला जातो.
आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी सांगितले की, ई-चलन प्रक्रिया पारदर्शक असावी. नागरिकांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे आणि प्रत्येक तक्रारीची सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. हीच सध्याची गरज आहे.
What's Your Reaction?






