कबुतरखान्यावरील बंदी उच्च न्यायालयाकडून कायम; मुंबई महापालिकेला नागरिकांचे मत घेण्याचे आदेश

मुंबई, १३ ऑगस्ट २०२५ : मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवरील बंदी कायम ठेवत मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत की, लोकांची भूमिका विचारात घेऊनच यासंदर्भात पुढील निर्णय घ्यावा.
न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, कबुतरखान्यांमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. त्यामुळे महापालिकेने यासंदर्भात सार्वजनिक नोटीस काढून नागरिकांची मते मागवावीत आणि त्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा.
यापूर्वी या विषयावर सामाजिक, धार्मिक आणि राजकीय पातळीवर वाद निर्माण झाला होता. एका गटाने धार्मिक भावना आणि पारंपरिक प्रथा जपण्याची मागणी केली होती, तर दुसऱ्या गटाने सार्वजनिक आरोग्याचा विचार करून बंदीची अंमलबजावणी करण्याची गरज मांडली होती.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे, आता मुंबई महापालिकेवर संतुलित निर्णय घेण्याची जबाबदारी आली आहे. नागरिकांचे मते, तक्रारी आणि सूचनांचा विचार करूनच पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
What's Your Reaction?






