वसई : काँग्रेस आणि आप पक्षाकडून ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव कार्यक्रम

वसई :  काँग्रेस आणि आप पक्षाकडून ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव कार्यक्रम

वसई - विधानसभेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनवरून काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्ष आक्रमक झाला असून आता वसईत ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वसई-विरार शहर काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि समाज शुद्धी अभियान ईव्हीएम हटाव समिती यांच्या संयुक्त सहकार्याने 'ईव्हीएम हटाव, लोकशाही, लोकतंत्र बचाव अभियान बॅलेट (मतपत्रिका ) पेपर लाव संविधान बचाव' हा कार्यक्रम होणार आहे. 

सदर कार्यक्रमातप्रमुख वक्ते याविषयावरील आपली मते मांडणार आहेत. फिरोज मिठीबोरवाला, धनंजय रामकृष्ण शिंदे, काँगेसचे विजय पाटील तसेच अशोक भाटे हे प्रमुख वक्ते असणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५:३० वाजता वसई पारनाका येथील काँग्रेस भवन येथे होणार आहे. वसई विरार शहर जिल्हा काँगेसचे जिल्हाध्यक्ष ओनील अल्मेडा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow