मुंबई - गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट समुद्रात उलटली!

मुंबई - मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटल्याची घटना घडली. बोट गेट ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जात असताना अशी दुर्दैवी घटना घडली. उलटलेल्या बोटीत ३० प्रवासी असल्याचे सांगितले जात असले तरीही याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांना सुखरूप वाचविले जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटाकडे जाणारी बोट दुपारी चार वाजताच्या सुमाारास अचानक समुद्रात बुडू लागली. यानंतर स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि यलोगेट पोलिस स्टेशन ३ यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचावकार्याला सुरूवात केली आहे. या घटनेत सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नेमके कशामुळे बोट समुद्रात उलटली? हे अद्याप समजू शकलेले नाही. अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. नीलकमल असे या बोटीचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
What's Your Reaction?






