दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने उपाय – परिवहन मंत्र्यांचा अल्टिमेटम

दहिसर टोल नाक्यावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना तातडीने राबवण्याचे आदेश महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. सोमवारी टोल नाक्याची पाहणी करताना त्यांनी टोल व्यवस्थापनाला कडक शब्दांत सुनावले.चार दिवसांपूर्वी सुचवलेल्या उपाययोजना अद्याप प्रभावीपणे राबवल्या नसल्याने त्यांनी प्रशासन आणि ठेकेदारांना येत्या शनिवारीपर्यंत अंतिम अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा, संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून त्यांचे करार रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
What's Your Reaction?






