दिवाळीच्या तोंडावर आयुक्तालयातील ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार

दिवाळीच्या तोंडावर आयुक्तालयातील ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार

वसई : मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. निवडणूक आयोगाने काढलेल्या परिपत्रकात हे नमूद करण्यात आलेले आहे. एका आयुक्तालयात दोन जिल्हे असल्यास ३ वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश आयोगाने पोलीस महासंचालकांना दिले आहेत. काही अधिकाऱ्यांची बदली ही लोकसभा निवडणुकांपूर्वीच झाल्याने आता पुन्हा बदली होणार असल्याने त्यांनी या बदलीविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हे परिपत्रक काढण्यात आले आहे. या आदेशामुळे मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील अडीचशे पोलिसांना या आदेशाचा फटका बसणार आहे. ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात येतात. ऐन दिवाळीच्या दिवसांत बदली होणार असल्याने या बदल्यांमुळे पोलिसांमध्ये निराशा पसरलेली आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow