नायगाव : प्लायवूड कारखान्याला भीषण आग

नायगाव - नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसरात असलेल्या एका प्लायवूडच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन दल त्वरित घटना स्थळी पोहोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, कारखान्याला लागलेली आग इतकी भीषण होती की यात कारखान्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले.
नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसरात एम आर पी इंडस्ट्रियल इस्टेट आहे. यात प्लायवूड तयार करण्याचा कारखाना आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अचानक पणे आग लागली. या आगीच्या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले होते. .
लाकडी साहित्य असल्याने आग भडकली
सदर कारखान्यात प्लायवूड तयार केला जात असे, त्यामुळे या कारखान्यात लाकडी साहित्याचा मोठ्या प्रमाणावर साठा होता. आग लागल्यानंतर लाकडी साहित्याला आग लागली त्यामुळे आग भडकली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले.
What's Your Reaction?






