नालासोपारा : शेजाऱ्याशी जुन्या वादातून ५० वर्षीय व्यक्तीने २३ वर्षीय तरुणावर चाकूहल्ला; आरोपी अटक

नालासोपारा : शेजाऱ्याशी जुन्या वादातून ५० वर्षीय व्यक्तीने २३ वर्षीय तरुणावर चाकूहल्ला; आरोपी अटक

पालघर, १५ मे २०२५:नालासोपारा पूर्वेतील जाधव पाडा, धनीव बाग परिसरात जुन्या वादातून एका ५० वर्षीय व्यक्तीने आपल्या २३ वर्षीय शेजाऱ्यावर चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात अब्दुल रहीम शेख (२३) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पेल्हार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, आरोपी जगन्नाथ बिहारीलाल तिवारी (५०) याने शेजारी राहणाऱ्या अब्दुल रहीम शेख याच्याशी जुना वाद पुन्हा उकरून काढत वाद घातला. वादाच्या दरम्यान तिवारीने प्रथम अब्दुलला शिवीगाळ केली व त्यानंतर पेटीतून चाकू काढून पोटात भोसकले.

हल्ल्याच्या वेळी अब्दुलची पत्नी प्राची सचिन चव्हाण ऊर्फ रजिया अब्दुल रहीम शेख (२३) घटनास्थळी उपस्थित होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने तिलाही धमकावले व मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

१४ मे रोजी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जगन्नाथ तिवारी याला अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत कलम ११८(२) (उकसवणे), ३५२ (मारहाण), तसेच इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपीच्या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस उपनिरीक्षक युवराज चौधरी या प्रकरणाचा तपास करत आहेत, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वानकोटी यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दरम्यान, पीडित युवक अब्दुल रहीम शेख याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow