पश्चिम बंगाल : आंदोलनरत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज ,महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येचे प्रकरण

पश्चिम बंगाल:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागमी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आज, मंगळवारी कोलकाता पोलिसांनी जबरदस्त लाठीचार्ज केला. पाण्याचा मारा आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडूनही आंदोलक मागे हटत नसल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला.
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल प्रक्षिणार्थी महिला डॉक्टरावरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला नबन्ना अभिजन असे नाव दिले असून, विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नबन्ना प्रोटेस्टचे आयोजन रवींद्रभारती विश्वविद्यालयातील एमएचे विद्यार्थी प्रबीर दास, कल्याणी विश्वविद्यालयातील शुभंकर हलदर आणि सयान लाहिडी नावाच्या विद्यार्थ्यांनी बोलावले. आम्हाला राजकारणाशी काही देणे घेणे नाही परंतु ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
पोलिसांनी नबन्नापर्यंत( राज्य सचिवालय) लाँग मार्च रोखण्यासाठी हावडा ब्रीजवर बॅरिकेट्स लावले होते. जे पाडून आंदोलनकर्ते पुढे जाऊ लागले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी वॉटर गनच्या माध्यमातून पाण्याचे फवारे आंदोलकांवर सोडले त्यासोबत लाठीचार्जही केला. त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांकडून अश्रूधुराचा मारा होताच संतापलेल्या जमावाने दगडफेक सुरू केली. या काही आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांना मारहाणीचे व्हिडिओही समोर आले आहेत.दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट निवासस्थानाजवळही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
What's Your Reaction?






