मुंबई: 'पुढच्या वर्षी लवकर या', 'निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...', असे म्हणत राज्यभरातील करोडो गणेशभक्तांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. मुंबई, पुण्यासह राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील विविध ठिकाणी गणेश चतुर्थीला लाडके बाप्पा घरोघरी किंवा भव्य दिव्य गणेशमूर्ती मोठ्या उत्साहात सार्वजनिक मंडळात विराजमान झाल्या होत्या. मात्र आज १० दिवसांचा पाहुणचार घेऊन भाविकांकडून निरोप देण्यात आला. यामध्ये मुंबईत लालबागचा राजा, केशवजी नाईक चाळमधील गणपती (गिरगाव), चिंतामणी (चिंचपोकळी), नरे पार्कचा गणपती (परळ), गणेश गल्लीचा राजा, तेजुकाया गणपती (लालबाग), जीएसबी गणपती (किंग्ज सर्कल) आदी गणपती विशेष प्रसिद्ध आहेत. तसेच पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदी पारंपारिक गणपती आहेत. गणेशोत्सवात महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून या गणपतींच्या दर्शनासाठी भाविक मुंबई, पुण्यात येत असतात. याशिवाय अन्य प्रमुख शहरांतही पालखी, ढोल-ताशा, लेझीम, वाजत गाजत पारंपारिक वेशभूषेत निरोप देण्यात आला. यावेळी विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर तर अरबी समुद्र आणि भाविकांचा जनसागर एकमेकांमध्ये समाविष्ट झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीचे विसर्जन, तर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पालाही निरोप, बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची गर्दी पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती साकारली होती. पुण्यात गणेशोत्सवाचा आगळा-वेगळा जल्लोष दिसून आला. यासोबतच राज्यातील नागपूर, अमरावती, वर्धा, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, छत्रपती संभाजीनगर, बिड येथे गणेश विसर्जनाची धूम दिसून आली. धुळ्यात विसर्जनाच्या आनंदावर विर्जण टाकणारी घटना घडली. धुळे शहराच्या जवळ असलेल्या चितोड गावात गणेश विसर्जनाची मिरवणूक निघण्यापूर्वीच एका ट्रॅक्टरखाली येऊन 3 चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला. या चिमुकल्यांचे वय अनुक्रमे 4, 7 आणि 14 वर्षे होते. येथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरजवळ या मुली खेळत असताना हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तर विठ्ठलाची नगरी असलेल्या पंढरपुरात मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड जोडत असताना अमोल खुटाले नामक तरुणाला ब्रेन हॅम्रेज होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पंढरपूर शहरातील सर्वात मोठे मंडळ असणाऱ्या श्रीमंत लोकमान्य मंडळाने गणेश विसर्जन मिरवणूक रद्द केली आहे. दरम्यान, अहमदनगरमध्येही दुर्दैवी घटना घडली आहे. ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे हे अहमदनगर पोलीस दलात कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता. दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत ज्ञानेश्वर मोरे यांनी मराठी चित्रपटाच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला. गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर ते आपल्या घरी परतले. घरी गेल्यावर ज्ञानेश्वर मोरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुढच्या वर्षी लवकर या...' राज्यभरात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
गणेशोत्सवपूर्वी रस्ते दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा सार्वजनिक बांधकाम विभागाला ठणकाव
पालघर ...
मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याचा जमावाकडून झालेल्या हल्ल्यात मृत्यू; सहा आरोपी अटकेत
मुंबई: मालाड पूर्व रेल्वे स्थानकाजवळ १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या भयंकर रो...
भाईंदरमध्ये ऑनलाईन ट्रेंडिंगच्या नावाखाली फसवणूक; सायबर शाखेने परत मिळवून दिले १४ लाख रुपये
मीरा भाईंदर - दिवसेंदिवस सायबर गुन्हे प्रकरणात वाढ झाली असून फेसबुक, टेलिग्राम आदींवर शेअर ट्रेडिंग करण्याचे आमिष दा...
भाईंदर पश्चिम: मोरवा पुलाच्या नामांतरावरून वाद
भाईंदर पश्चिम:भाईंदर पश्चिम येथील मोरवा पुलाचे नामांतर केल्यानंतर स्था...
Stay Connected
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्गत भव्य स्वच्छता अभियान राबवले
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनां...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०४६ चौ. फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने १...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्यक आयुक्त गणेश पाटील निलंबित
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठ...
Previous
Article