पेटीएमने आर्थिक स्थितीला मजबूती प्रदान करण्यासाठी घेतलेले मोठे निर्णय.

दिल्ली,पेटीएम कंपनीने आपल्या आर्थिक स्थितीला मजबूत करण्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कंपनीने आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीच्या आधी बोर्ड सदस्यांचे मानधन कमी करण्याचा प्रस्ताव मंडळासमोर ठेवला आहे.
फिनटेक कंपनी पेटीएमने आपल्या फायनान्सियल स्थितीला सुधारण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये, कंपनीने आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या (संचालक मंडळाच्या) वार्षिक वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमच्या मातृसंस्थेने (वन 97 कम्युनिकेशन) स्टॉक मार्केटला दिलेल्या सूचनेत म्हटले आहे की संचालक मंडळाचे वेतन कमी करण्याचा विचार सुरू आहे.
नवीन सुधारित वेतन रचना कंपनीने केलेल्या बेंचमार्किंगवर आधारित आहे. समान मार्केट कॅपिटलायझेशन आणि तत्सम क्षेत्रातील कंपन्यांची वेतन रचना लक्षात घेऊन ही नवीन वेतन रचना तयार करण्यात आली आहे. पेटीएमची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) १२ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे, आणि त्याच्या आधीच कंपनीच्या संचालक मंडळाने या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे म्हटले आहे.
याआधी, अशित रंजीत लीलानी यांसह पेटीएम कंपनीच्या बोर्ड सदस्यांचे मानधन १.६५ कोटी रुपये होते, तर गोपालसमुद्रम श्रीनिवास राघवन सुंदरराजन यांचे मानधन २.०७ कोटी रुपये होते. नवीन सुधारित रचनेनुसार, प्रत्येक नॉन-एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडंट डायरेक्टरचे मानधन कमाल ४८ लाख रुपयांपर्यंत मर्यादित असणार आहे, ज्यात २० लाख रुपये निश्चित वेतन असणार आहे. या निर्णयामुळे सुशासन अधिक प्रभावीपणे लागू होईल. सुधारित वेतन संरचना १ एप्रिल २०२४ पासून लागू होईल.
What's Your Reaction?






