Anil Ambani Share: शेअर आहे की रॉकेट… थांबता थांबेना अनिल अंबानींच्या स्टॉकमधील तेजी, पुढेही गुंतवणूक फायद्याची?

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचे धाकटे भाऊ अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सध्या जोरदार तेजी दिसत आहे. मागील तीन दिवसांत या शेअर्सने १६ टक्क्यांनी वाढ केली आहे, आणि बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या व्यापाराच्या दिवशी, रिलायन्स पॉवर शेअरने वरच्या सर्किटला धडक देत नव्या उच्चांकी किंमतीवर पोहोचले. या तेजीचे मुख्य कारण म्हणजे एक महत्वाची डील.
कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानींसाठी आनंदाची बातमी म्हणजे रिलायन्स पॉवरचे शेअर्स गेल्या तीन दिवसांत अप्पर सर्किट हिट करत आहेत. अदानी पॉवरने नागपूरात औष्णिक ऊर्जा प्रकल्प खरेदी करण्याच्या बोलण्यामुळे अनिल अंबानींच्या शेअर्सना मोठी चालना मिळाली आहे. हा प्रकल्प विदर्भ पॉवर इंडस्ट्रीजचा भाग आहे, जी रिलायन्स पॉवरची उपकंपनी आहे. त्यामुळे रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी होत आहे.
रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची मार्केट कॅप सध्या १४,५२९.३८ कोटींवर पोहोचली आहे. रिलायन्स पॉवरचा आयपीओ जानेवारी २००८ मध्ये आला होता, आणि त्यावेळी इश्यू किंमत ४०५ ते ४५०० रुपये होती. गुंतवणूकदारांनी या आयपीओला उत्तम प्रतिसाद दिला आणि लिस्टिंगच्या दिवशी २१ टक्के प्रीमियमसह ५४७.८० रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र, नंतरच्या काळात शेअर्सची किंमत २७ मार्च २०२० रोजी १.१३ रुपयांपर्यंत घसरली. पण गेल्या चार वर्षांत रिलायन्स पॉवरच्या स्टॉकमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, गेल्या वर्षभरात ११५ टक्क्यांनी किंमत वाढली आहे.
वेल्थमिल सिक्युरिटीजच्या इक्विटी स्ट्रॅटेजीचे संचालक क्रांती बाथिनी यांच्या मते, नागपूरमधील ६०० मेगावॅटचा थर्मल प्लांट खरेदी करण्याच्या अदानी पॉवरच्या बोलणीच्या बातम्यांमुळे स्टॉकमध्ये हालचाल सुरू आहे. एंजल वनचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक ओशो कृष्णा यांना असे मानते की, रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सध्या जोरदार तेजी आहे, आणि शेअर्स ४२ ते ४५ रुपयांपर्यंत उडी घेऊ शकतात, तर ३० ते ३२ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष रवी सिंग यांचे मत आहे की, अनिल अंबानींच्या शेअरला ३८ रुपयांचे लक्ष्य आहे.
What's Your Reaction?






