बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

बदलापूर, : बदलापूरमधील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली असून, आता कल्याण न्यायालयाने त्याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी अक्षय शिंदेला आज पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते, जिथे न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी या प्रकरणात युक्तिवाद केला. पोलिसांनी आरोपीच्या कृत्याबाबत सखोल तपास करायचा असल्याचे न्यायालयासमोर मांडले.

आरोपी अक्षय शिंदेला 17 ऑगस्टला अटक करण्यात आली होती, त्यानंतर न्यायालयाने 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीच्या कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. या घटनेनंतर बदलापूरमध्ये मोठे आंदोलन झाले होते, ज्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow