बदलापूर घटनेवर राज ठाकरे यांचा संताप; सरकारवर जोरदार टीका

बदलापूर घटनेवर राज ठाकरे यांचा संताप; सरकारवर जोरदार टीका

मुंबई,  बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर कठोर टीका केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि राज्य सरकारला जाब विचारला आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये विचारलं आहे, "जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का?" त्यांनी सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेवरही टीका करत म्हटलं आहे की, "जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा त्या सुरक्षित आहेत, ही भावना निर्माण करणं अधिक महत्त्वाचं आहे."

बदलापूरमधील घटनेवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास 12 तासांचा उशीर केल्याचा आरोप झाला आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांनी या प्रकरणात मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे आणि या मुद्द्याला त्यांनी पुढे आणल्याबद्दल गर्व व्यक्त केला आहे.

"मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे," असंही राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow