म.प्र. जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू, मेळघाटमधून स्थलांतरित झाल्याची शक्यता

अमरावती :धारणी तालुक्यात सीमालगत जवळच असलेल्या बुरहानपुर जिल्ह्यातील नेपानगर भागाचे सातपुडाच्या जंगलात दोन दिवसांपूर्वी वाघ मरण पावल्यने एकच खळबळ उडाली आहे. मेळघाटला लागून असलेल्या खकनार व नेपानगरच्या जंगलात पट्टेदार वाघाची नोंद नसल्याने मृत वाघ मेळघाटच्या जंगलातून फिरत फिरत भटकून आल्याची शक्यता मध्यप्रदेश वन विभागाने व्यक्त केली आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प तथा प्रादेशिक वनविभागाच्या जंगलाला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील बुरहानपुर वनविभागाच्या नेपानगर रेंजच्या हसबपुरा गावालगतच्या जंगलात शुक्रवारी अंदाजे दहा वर्ष वयाचा वाघ मृताअवस्थेत दिसला. डी.एफ.ओविजयसिंह, रेंजर श्रीराम पांडेय, मुख्य सरंक्षक रमेश गणावर, एसडीओ मानसिंग खराडीसह अनेक अधिकाऱ्यांनी मोक्यावर भेट दिली. महाराष्ट्रातील काही वन अधिकारी पण मोक्यावर पोहचले असल्याची अधिकृत माहिती आहे. मात्र, या विषयी वन्यजीव विभाग, अकोट आणि धारणीतील अधिकारीसोबत बोलून माहिती घेतली असता वाघाच्या मृत्यू झाल्याचे माहिती नसल्याचे सांगितले.
जंगलात ड्रोनद्वारे सर्चिग : नेपानगरच्या जंगलातून अत्याधुनिक ड्रोनव्दारे सचिंग करण्यात आली. पण शिकार झाल्याचा पुरावा नमिळाल्याची माहिती असून वाघाच्या मिशा, दात, नखांसह सर्व अवयव साबुत आढळून आली. प्राकृतीक स्वरूपात मरण झाल्याचे प्रथम दर्शनी वाटत असले तरी मृत वाघाचे पोट रिकामे होते, अशी गंभीर माहिती आहे. म्हणजे वाघकुपोषित होता, असा अंदाज आहे. शिकारच्या शोधात भटकून नेपानगरच्या
जंगलात पोहचल्याचा प्राथमिक अनुमान आहे. एका माहितीप्रमाणे मेळघाट व्याघ्र
प्रकल्पातून शिकाराच्या शोधात किंवा जंगलात भटकून अनेकप्राणीबुरहानपुर
वन मंडळाच्या जंगलात येत असतात. मागील वर्षी पण नेपानगरच्या जंगलात
एका वाघाचा मृतदेह आढळला होता. हसनपुरच्या वनकक्ष क्रमांक १९७ मध्ये
मृत सापडलेल्या वाघाचे शवविच्छेदन शनिवारी तज्ज्ञांनी केल्यावर विसेरा
सुक्ष्म तपासणीसाठी इंदोरला पाठविण्यात आला. प्रथमदर्शनी अनुमान लावले जात आहे की, चार दिवसांपूर्वीच वाघाला प्राकृतीक किंवा भुकेमुळे मरण आले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
What's Your Reaction?






