मीरा भाईंदरमध्ये ऐतिहासिक सोहळा: साईबाबा नगर ते शिवार गार्डन मार्गाचे भव्य उद्घाटन

मीरा भाईंदर शहरवासीयांसाठी आजचा दिवस विशेष ठरला आहे. साईबाबा नगर ते शिवार गार्डन या मेट्रो एलिव्हटेडच्या नवीन ब्रिजचे उद्घाटन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम आज उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिबीन कापून या मेट्रो एलिव्हटेडच्या नवीन ब्रिजचे उदघाटन केले
या नव्या मार्गाच्या उद्घाटनामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. आमदार, मा जी नगरसेवक, स्थानिक नागरिक आणि एम एम आर डी च्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?






