लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला ३०० जागांहून अधिक मिळण्याची शक्यता, पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२५:पारंपारिक राजकीय गणितांमध्ये उलथापालथ घडताना दिसत आहे. मागील वर्षी २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी २३९ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. परंतु ताज्या सर्व्हेनुसार, आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला ३०० हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.
इंडिया टुडे आणि सी व्होटर्सचा 'मूड ऑफ द नेशन' सर्व्हे
इंडिया टुडे ग्रुप आणि सी व्होटर्सने केलेल्या 'मूड ऑफ द नेशन' या सर्व्हेमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३४३ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. सर्व्हेनुसार, भाजपाला २८१ जागा मिळतील, तर काँग्रेसला फक्त ७८ जागा मिळण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या होत्या, परंतु या सर्व्हेनुसार काँग्रेसच्या जागांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला १८८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पंतप्रधान म्हणून मोदींची पसंती
सर्व्हेनुसार, पंतप्रधान म्हणून ५१ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पसंती दर्शवली आहे. तर राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून २४.९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. अरविंद केजरीवाल यांना फक्त १.२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणारे पंतप्रधान म्हणून मोदींची आघाडी
सर्व्हेमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला होता - "आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करणारे पंतप्रधान कोण?" त्याला ५०.७ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना उत्कृष्ट पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे. यामध्ये पंडित नेहरूंची कार्यक्षमता देखील ५.२ टक्के लोकांनी ओळखली आहे.
सर्व्हेनुसार, एनडीएला ४६.९ टक्के मतं मिळतील, तर इंडिया आघाडीला ४० टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील निकाल काय असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, परंतु हा सर्व्हे सध्याच्या राजकीय वातावरणाचा महत्त्वपूर्ण दृष्टीकोन देतो.
What's Your Reaction?






