वसई-विरार महापालिकेत 2025 मध्ये मोठी भरती! 110 रिक्त पदांवर संधी, 75 हजारांपर्यंत पगार

वसई:वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC) अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत विविध पदांसाठी 2025 मध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण 110 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांना दरमहा 75 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे.
रिक्त पदांचा तपशील:
भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये खालीलप्रमाणे विविध पदांचा समावेश आहे –
-
बालरोग तज्ज्ञ – 01
-
साथरोग तज्ज्ञ – 01
-
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 13
-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 20
-
वैद्यकीय अधिकारी – 37
-
स्टाफ नर्स (स्त्री) – 08
-
स्टाफ नर्स (पुरुष) – 01
-
औषध निर्माता – 01
-
योगशाळा तंत्रज्ञ – 03
-
बहुउद्देशीय आरोग्य सेवक – 25
शैक्षणिक पात्रता:
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता भिन्न आहे:
-
बालरोग तज्ज्ञ – MD Paed / DCH / DNB
-
साथरोग तज्ज्ञ – MBBS / BDS / AYUSH + MPH/MHA/MBA (Health)
-
वैद्यकीय अधिकारी वर्ग – MBBS पदवी
-
स्टाफ नर्स – GNM / B.Sc. (Nursing)
-
औषध निर्माता – D.Pharm / B.Pharm
-
योगशाळा तंत्रज्ञ – B.Sc. किंवा DMLT
-
बहुउद्देशीय आरोग्य सेवक – १२वी (विज्ञान शाखा) + पॅरामेडिक बेसिक ट्रेनिंग किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
वयोमर्यादा:
-
वैद्यकीय पदांसाठी – 70 वर्षांपर्यंत
-
इतर पदांसाठी – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट)
निवड प्रक्रिया:
-
बालरोग तज्ज्ञ, साथरोग तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी पदासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
-
इतर पदांसाठी निवड ‘मेरिट लिस्ट’वर आधारित मूल्यांकन पद्धतीने होणार आहे. यासाठी कोणतीही मुलाखत होणार नाही.
अर्ज कसा करावा?
-
उमेदवारांनी फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
-
अर्ज पाठवायचा पत्ता:
वसई-विरार महानगरपालिका, मुख्यालय, तिसरा मजला, यशवंतनगर, विरार (प.)
पगाराचा तपशील:
या भरतीमध्ये वेतनश्रेणी पदानुसार निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना दरमहा किमान ₹18,000 ते ₹75,000 पर्यंत वेतन मिळेल.
अर्ज शुल्क:
या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही.
What's Your Reaction?






