वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांची यादी प्रसिद्ध

विरार : वसई- विरार शहर महानगरपालिका, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार फेरीवाल्यांना सहाय्य या उपांगा अंतर्गत वसई-विरार शहरातील स्थिर, फिरते, हंगामी व तात्पुरते फेरीवाल्यांचे सन २०१७ कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षण हे महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अॅपद्वारे बायोमॅट्रिक पद्धतीने करण्यात आलेले असून १५१५६ फेरीवाल्यांची सर्वेक्षणामध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. दि. १२/०९/२०२४ रोजी मा. आयुक्त महोदयांच्या अध्यक्षतेखाली शहर पथविक्रेता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत सन २०१७ मध्ये सर्वेक्षण पूर्ण झालेल्या १५१५६ पथविक्रेत्यांची यादी प्रसिध्द करणे बाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, सदर नोंदणीकृत पथविक्रेत्यांची यादी महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समिती कार्यालयात व वेबसाईटवर अधिकृतरित्या प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीमधील तपशीलाबाबत नागरिकांना सूचना/हरकती नोंदविणेची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२४ असून नागरिकांना आपल्या सूचना/हरकती संबंधित प्रभाग समिती कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात देता येतील.
What's Your Reaction?






