वसई - वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागरूक नागरिक संस्था आणि जय हिंद वाचनालय ह्यांच्या संयुक्त विद्यमाने वसई वाचन कट्टा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम साप्ताहिक स्वरूपाचा असून प्रत्येक रविवारी हुतात्मा स्मारक उद्यान वसई येथे सकाळी ८ ते १० या वेळेत होणार आहे.
यात सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. आपल्या आवडत्या पुस्तकासह कुणालाही या उपक्रमात सहभागी होऊन निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे पुस्तक वाचनाचा आनंद घेता येणार आहे . तसेच आपण वाचलेल्या पुस्तकाविषयी इतरांसोबत चर्चाही करता येणार आहे. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे तसेच धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत पुस्तक वाचनातून आनंद मिळवा म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Previous
Article