वालीवच्या आई माउली उत्सव मंडळाच्या मानाच्या हंडीचा मान सारंग मित्र मंडळाला ,मुस्लिम बांधवांचाही दहीहंडी उत्सवात सहभाग

वसई मुंबई , ठाण्याप्रमाणेच पालघर तालुक्यातहि दहीहंडीचा उत्साह व थरार पाहायला मिळाला. वसई तालुक्यात अनेक ठिकाणी मोठं मोठ्या रक्कमेच्या दहीहंडी बांधून फोडण्यात आल्या मात्र या साऱ्यांमध्ये सामाजिक सलोखा जपत वालीव, गोलाणी नाक्याचे "आई माउली सार्वजनिक उत्सव मंडळ " उजवे ठरले. भगवानदत्त पांडेय उर्फ रविभाई पांडेय यांच्या कुटुंबियांतर्फे दहीहंडी उत्सव गेल्या 12 वर्षा पासून साजरा केला जात आहे.मंडळाच्या दहीहंडी उत्सवात मुस्लिम बांधवांचाही सहभाग पहायला मिळाला.
या मंडळाची मानाची हंडी फोडण्याचा मान सारंग मित्र मंडळाला मिळाला. जिल्ह्यातील महत्वाची व सर्वात मोठी दहीहंडी समजली जाणारी विरार, मनवेल पाढ्याची श्री कृष्ण जन्मोत्सव मंडळाची, अर्थात माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील, व माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांची मानाची " युवा आमदार दहिहंडी" व आचोळे गावातील माजी महापौर रुपेश जाधव यांची दहिहंडी मोठ्या समजल्या जातात. येथे हिन्दी - मराठी कलाकारांची हजेरी असते यावेळीहि अनेक कलाकारांनी येथे उपस्थिती दर्शवली. तरीही वालिव, गोलाणी येथील समाजसेवक भगवानदत्त पांडे उर्फ रवीभाई यांच्या आई माउली सार्वजनिक उत्सव मंडळ व राहुल घरत यांच्या सारंग मित्र मंडळाच्या सहयोगाने आयोजित दहिहंडी उत्सवात वसईतील अनेक गोविंदा पथकांनी उपस्थिती दर्शवली. रवीभाई स्वतःच्या खर्चाने हा उत्सव गेली अकरा वर्षांपासून साजरा करत आहेत.
त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पत्नीसह दोन्ही मुले तुषार पांडे व विष्णू पांडे साथ देतात. त्यांच्या व्यासपीठावर मुस्लिम बांधवाचीहि उपस्तिती पहायला मिळाली त्यामुळे खऱ्या अर्थाने येथे सामाजिक एकोपा पहायला मिळतो . आमदार हितेंद्र ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव, आमदार राजेश पाटील , ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशिनाथ पाटील , माजी महापौर नारायण मानकर , प्रवीण शेट्टी, माजी सभापती वृन्देश पाटील, माजी नगरसेवक किशोर धुमाळ , माजी नगरसेविका उषा ठाकूर , प्रकाश वनमाळी यांनी उपस्थित राहून रवीभाई यांच्या कार्याचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?






