विरार : वसई विरार शहर मनपाच्या 'आय' प्रभाग समिती साठी अलका खैरे यांची नियुक्ती झाली आहे. ते या प्रभागचे ३० वे सहायक आयुक्त आहेत. पालिकेचा सर्वात संवेदनशील विभाग म्हणून या प्रभागाची ख्याती आहे.भरमसाठ तक्रारी अर्ज, घोटाळे, विविध वादग्रस्त प्रकरणे यामुळे कायम चर्चेत असलेल्या या प्रभागातील कधीच बदली न होणारे स्थानिक कर्मचारी वर्ग यामुळे या प्रभागात अधिकारी येण्यास नाकं मुरडतात. 

सदर प्रभागाचा पदभार अल्पावधी करता सहायक आयुक्त निलेश म्हात्रे यांच्याकडे देण्यात आला होता. पालिका मुख्यालयाच्या बांधकाम विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे देण्यात आला होता. सोमवारी बदली आदेशा प्रमाणे शासनकड़ून प्रति नियुक्तीने खैरे यांना सदर प्रभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. 

आतातरी या प्रभागाचा कारभार सुरळीत सुरु होईल अशी शक्यता नाही. नवनियुक्त सहायक आयुक्त अलका खैरे यांची तात्कालीन ठाणे मनपाच्या दिवा प्रभागात बेकायदा बांधकाम प्रकरणी एक ओडियो व्हायरल झाली होती. या वादग्रस्त ओडियो नंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. 

त्यानंतर त्यांच्याकडे ठाणे मनपा मधे जाहिरात, निवडणूक आणि जनगणना विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यामुळे आता या विभागाची धुरा त्या कुठल्या पद्धतीने वाहतात याकडे नागरिकांचे लक्ष आहे.