विरार : चंदनसार येथे भीषण आग; दोन बस आगीत जळून खाक
विरारच्या चंदनसार येथील आरटीओ कार्यालयाच्या परिसरात ही आग लागली. या आगीत दोन बस आगीत जळून खाक झाल्या आहेत.

विरार - विरार पश्चिमेच्या चंदनसार येथे आग लागण्याची घटना घडली आहे. येथील आरटीओ कार्यालयाच्या परिसरात उभ्या करण्यात आलेल्या दोन बसेसला आग लागली. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाला आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी दीड तास प्रयत्न करावे लागले. सुदैवाने यात कोणतीही जिवतीहानी झालेली नाही. मात्र, दोन्हीही बस आगीत जळून खाक झाल्या आहेत.
आरटीओ कार्यालया परिसरात असणाऱ्या या बसेसना आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या परिसरात इतरही वाहने उभी केलेली असतात मात्र पालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.
What's Your Reaction?






