नागपुर : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, एकूण 33 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी सोहळा पार पडला आहे

नागपुर : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, एकूण 33 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

नागपूर - महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी सोहळा पार पडला आहे. याआधी 5 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. मुंबईत मोठा सोहळा पार पडला होता. पण त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. महायुतीत खातेवाटपावरुन एकमत होत नसल्याने विस्तार रखडल्याचं बोललं जात होतं. पण अखेर आज शपथविधी सोहळा पार पडला आहे. 

मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 जणांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाच्या 3, शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. 


शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांची संपूर्ण यादी 
1) चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा
2) राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा
3) हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस
4) चंद्रकांत पाटील, भाजपा
5) गिरीश महाजन, भाजपा
6) गुलाबराव पाटील, शिवसेना
7) गणेश नाईक, भाजपा
8) दादा भुसे, शिवसेना
9) संजय राठोड, शिवसेना
10) धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस
11) मंगलप्रभात लोढा, भाजपा
12) उदय सामंत, शिवसेना
13) जयकुमार रावल, भाजपा
14) पंकजा मुंडे, भाजपा
15) अतुल सावे, भाजपा
16) अशोक उईके, भाजपा
17) शंभूराज देसाई, शिवसेना
18) आशिष शेलार, भाजपा
19) दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस
20) आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
21) शिवेंद्रराजे भोसले, भाजपा
22) माणिकराव कोकाटे, भाजपा
23) जयकुमार गोरे, भाजपा
24) नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस
25) संजय सावकारे, भाजपा,
26) संजय शिरसाट - शिवसेना
27) प्रताप सरनाईक, शिवसेना
28) भरत गोगावले, शिवसेना
29) मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
30) नितेश राणे, भाजपा
31) आकाश फुंडकर, भाजपा
32) बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
33) प्रकाश आबिटकर, शिवसेना
34) माधुरी मिसाळ, भाजपा (राज्यमंत्री)
35) आशिष जैस्वाल, शिवसेना (राज्यमंत्री)
36) पंकज भोयर, भाजपा (राज्यमंत्री)
37) मेघना बोर्डीकर, भाजपा (राज्यमंत्री)
38) इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (राज्यमंत्री)
39) योगेश कदम, शिवसेना (राज्यमंत्री)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow