स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रमदान मोहीम, सफाई दूतांचा सन्मान आणि पथनाट्य संपन्न

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रमदान मोहीम, सफाई दूतांचा सन्मान आणि पथनाट्य संपन्न

विरार : ०७/०२/२०२५ रोजी :वसई-विरार शहर महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि संयोगी संस्था अलाईड सोल्युशन सर्विसेस यांच्या मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ वसई-विरार अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. याअंतर्गत श्रमदान मोहीम, सफाई कर्मचारी सन्मान सोहळा आणि पथनाट्य या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

प्रभाग समिती ए अंतर्गत आयोजित श्रमदान मोहिमेत शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, समाजसेवक, लोकप्रतिनिधी, पर्यावरण प्रेमी आणि सोसायटीतील नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या मोहिमेअंतर्गत विरार पश्चिमेकडील विराट नगर मैदान ते यशवंतनगर रोडपर्यंत स्वच्छता करण्यात आली. मोहिमेत १०० ते १५० नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. यावेळी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या पथनाट्याच्या माध्यमातून ओला व सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिक मुक्त शहर निर्मिती यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी पथनाट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि स्वच्छतेबाबत अधिक जागरूक होण्याचे वचन दिले.

प्रभाग समिती ए मध्ये एकूण ४००  सफाई दूत कार्यरत असून, त्यातील सर्वोत्तम १० सफाई दुतांचा नागरिकांच्या वतिने निवड करून त्यांच्या उत्कृष्ट कार्यगिरीबद्दल त्यांना विशेष सन्मान देण्यात आला. सन्मानित दूतांची नावे पुढीलप्रमाणे भारत चव्हाण, अविनाश तरे, पंकज घरत, रामदास वझे, मंजू चव्हाण, सोनाली सोडिये, उल्हास घरत, नयन पवार, राजेश मेहेर, विनय म्हात्रे, या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना सर्वोत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले.

वसई विरार महापालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सातत्याने उपक्रम राबवत असून विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करत आहे. त्याच बरोबर शहरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छतेचे संदेश देण्यासाठी शहरात सुशोभीकरण केले आहे. यामुळे पालिकेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

याच अनुषंगाने वसई-विरार महानगरपालिका आणि संयोगी संस्थांच्या प्रयत्नांमुळे स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे पार पडली. या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद आणि सहभाग अतिशय उल्लेखनीय ठरला. यावेळी मा. उपयुक्त- घनकचरा व्यवस्थापन विभाग,मा. सह आयुक्त - घनकचरा व्यवस्थापन विभाग, मा. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, मा. कनिष्ठ आरोग्य निरीक्षकयांच्या सह पालिका कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow