नागपूर : नव्या मंत्रिमंडळाबाबत अजून कोणतीही घोषणा झालेली नसली तरीही विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीला मात्र वेग प्राप्त झाला आहे. राज्यात नवे सरकार स्थापन होताच विशेष अधिवेशन होणार असून अधिवेशनातच नागपुरातील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त निश्चित होणार आहे.
अधिवेशनाची पूर्वतयारी अंतिम टप्यात
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नागपूरमधील रवी भवन, विधान भवन आणि आमदार निवास येथील पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे दरम्यान, ९ किंवा १७ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन सर्वसाधारणपणे दोन आठवडे चालते. यंदाचे हिवाळी अधिवेशन विशेष ठरणार आहे कारण महायुतीच्या आमदारांची संख्या ही जास्त असणार आहे तर विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या ही कमी असणार आहे.
मुख्यमंत्री पदासाठी अजूनही सस्पेन्स कायम आहे त्यामुळे नवे सरकार स्थापन करण्यासही विलंब होताना दिसत आहे.
विशेष अधिवेशनासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे मात्र यामध्ये तारखेचा निश्चित असा उल्लेख केलेला नाही. यामुळेच मुख्यमंत्री निवड आणि सरकार स्थापने संदर्भात दिल्लीत सुरू असलेल्या बैठका घडामोडी आणि हालचालींवर सर्वांचे लक्ष आहे. सरकार स्थापन होतास अधिवेशनाची तारीख ठरणार आहे.
Previous
Article