अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वार्षिक स्नेहमेळावा आणि सत्यनारायण महापूजा

वसई दिनांक २० : अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या प्रशासकीय आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. या पूजेच्या निमित्ताने स्नेहभोजन, विविध खेळ, कौटुंबिक स्नेहमेळावा अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, उपप्राचार्य आणि विविध विभागाच्या प्राध्यापकांनीही या कार्यक्रमात सहभागी होऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.
स्नेहमेळाव्याच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी एकाच रंगाचे पारंपरिक सदरे परिधान करून आपल्यातील एकात्मतेचे दर्शन घडवले. दुपारनंतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी संगीत खुर्ची तसेच इतर काही कौटुंबिक खेळ आयोजित करण्यात आले. प्रतिवर्षी होणाऱ्या या सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांचा एक अनौपचारिक स्वरुपाचा स्नेहमेळावा होतो आणि पुन्हा नव्या उर्जेने कामाला लागण्याची प्रेरणा मिळते असे महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. दिलीप वर्तक यांनी सांगितले.
What's Your Reaction?






