अमरावतीत धोक्याची घंटा; 14 दिवसांत डेंग्यूचे 88, तर चिकनगुन्याचे 58 रुग्ण.

अमरावतीत धोक्याची घंटा; 14 दिवसांत डेंग्यूचे 88, तर चिकनगुन्याचे 58 रुग्ण.

अमरावती शहरासह ग्रामीण भागात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झपाटणे वाढत आहे. मागील सात महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. मात्र १ ते १४ ऑगस्ट या १४ दिवसात डेंग्यूचे ८८ रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते जुलैदरम्यान डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ११० होती, अशी माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाने दिली आहे. याशिवाय खासगी रुग्णालयात कीटकजन्य आजाराचे रुग्णही दाखल होत आहे. मनपाची आरोग्य यंत्रणा सतर्क झालीआहे.

आरोग्य विभागाकडून विविध पथके नेमून शहरात विविध ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातही विविध उपाययोजना करण्यात येत आहे.गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे शासकीय रुग्णालयातील गर्दीवरून दिसून येत आहे. त्याबरोबरच जलजन्य तसेच कीटकजन्य आजारांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जिल्ह्यातील वातावरण बदलामुळे निर्माण झालेले दमट वातावरण हे या कीटकजन्य वाढीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी ताप, डोके दुखी, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे यासारख्या लक्षणांवर दुर्लक्ष न करता तातडीने रुग्णालयात जाऊन रक्ताची चाचणी करण्याची गरज आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात ग्रामीण भागात डेंग्यूचे ६८ आणि मनपा क्षेत्रात २० असे एकूण तब्बल ८८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. तर चिकनगुन्याचे ग्रामीण भागात ४० आणि मनपा क्षेत्रात १८ असे एकूण ५८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा हिवताप विभागाने दिली. १४ ऑगस्टपर्यंत २१ रुग्ण मलेरियाचे आढळले जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांबरोबरच मलेरियाचे देखील रुग्ण आढळून आले आहेत. १४ ऑगस्टपर्यंत मलेरियाचे २१ रुग्ण आढळले आल्याची माहिती हिवताप विभागाने दिली. कीटकजन्य आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी एक दिवस कोरडा पाळावा, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, डास चावणार नाही, अशा साधनांचा वापर करावा, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, ताप आल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. सात महिन्यात डेंग्यूचे रुग्ण ११०; २४४ नमुने तपासले जिल्ह्यात जानेवारी ते ३१ जुलै या सात महिन्यात १ हजार ६६ संशयित रुग्णांचे नमुने तपासले. यामध्ये ११० डेंग्यू पॉझिटिव्ह, तर ४० चिकनगुनिया रुग्ण आढळले होते. तर १ ते १४ ऑगस्ट या काळात २४४ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासले असता, यामध्ये ८८ डेंग्यू तर ५८ चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंग्यू रुग्णांची एकूण संख्या ही १९८, तर चिकनगुनिया रुग्णांची संख्या ९२ झाली आहे..

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow